Surabhi Jayashree Jagdish
भगवान गणेशाची पूजा करताना लोक ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करतात.
गणेशोत्सवात स्थापना पासून ते विसर्जनापर्यंत हाच जयघोष केला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषात ‘मोरया’चा खरा अर्थ काय आहे?
‘मोरया’चा अर्थ शास्त्र किंवा पुराणाशी संबंधित नाही, तर तो बाप्पाच्या भक्ताशी जोडलेला आहे.
‘मोरया’ म्हणजे संत मोरया गोसावी, जे गणपती बाप्पाचे परमभक्त होते.
संत मोरया गोसावी यांनी आपले संपूर्ण आयुष्य बाप्पाच्या भक्तीत समर्पित केले.
शेवटी संत मोरया गोसावी यांनी पुण्यातील चिंचवडमध्ये समाधी घेतली. यानंतर बाप्पाच्या नावासोबत ‘मोरया’ या नावाचा जयघोष सुरू झाला.
जेव्हा आपण ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो – हे गणपती बाप्पा, संत मोरया गोसावी यांच्याप्रमाणे आमच्या जीवनातही कृपा करा.