ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणातील खूप मोठं नाव आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे (ठाकरे गट) नेतृत्व करत आहे.
उद्धव ठाकरेंचा थोरला मुलगा आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, त्यांचा धाकटा मुलगा काय करतो तुम्हाला माहितीये का?
उद्धव ठाकरेंच्या धाकट्या मुलाचे नाव तेजस ठाकरे आहे. तेजस हे राजकारणापासून दूर आहेत.
तेजस ठाकरे हे वन्यजीव संशोधक आहेत. ते वन्यजीवांवर रिसर्च करत असतात.
तेजस ठाकरेंनी बॉम्बे ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.
यानंतर तेजस ठाकरे यांनी जय हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले.
तेजस ठाकरे हे अनेकदा वडील उद्धव ठाकरे आणि भाऊ आदित्य ठाकरेंच्या सभेला उपस्थित असतात.
मात्र, अजून त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही.