ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोकणात अनेक रहस्यमयी कथा प्रसिद्ध आहेत. यातील एक म्हणजे चकवा लागणं. ही एक स्थानिक लोकमान्यता (folklore) आहे.
कोकणामध्ये, विशेषतः घनदाट जंगल किंवा आडवाटांवरून प्रवास करताना चकवा लागतो, असं गावकरी म्हणतात.
या शब्दाचा अर्थ होतो की, एखादी व्यक्ती दिशाभूल होऊन एकाच ठिकाणी वारंवार फिरत राहते आणि तिला योग्य मार्ग सापडत नाही.
कोकणातील लोकांचा असा समज आहे की, चकवा हे एक प्रकारचं अदृश्य भूत किंवा दुष्ट आत्मा असतो, जो जंगलात किंवा विशिष्ट ठिकाणी राहत असतो.
हा चकवा रानात एकट्याने फिरणाऱ्या माणसाला गोंधळात पाडतो असा दावा केला जातो. यावेळी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना रस्त्याचा विसर पडतो आणि ते एकाच ठिकाणी फिरत राहतात. कितीही प्रयत्न केले तरी त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही.
काही लोक याला निसर्गातील एक प्रकारची 'रानभूल' मानतात. घनदाट जंगल, एकसारखे दिसणारे मार्ग, कमी प्रकाश आणि दिशेचे ज्ञान न राहिल्यामुळे माणूस गोंधळून एकाच ठिकाणी फिरू लागतो.
जेव्हा एखादी व्यक्ती अनोळखी आणि भयावह वातावरणात जाते तेव्हा मनावर ताण येतो. या ताणामुळे किंवा भीतीमुळे दिशांचे ज्ञान विस्मृत होते आणि व्यक्तीला दिशाभूल झाल्यासारखे वाटते. याला 'रोड हिप्नोसिस' म्हणतात.
या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, आम्ही याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.