Cockroach Eggs: घरात झुरळांचा सुळसुळाट झालाय? जाणून घ्या झुरळांची अंडी नेमकी कशी दिसतात आणि कुठे लपलेली असतात?

Manasvi Choudhary

झुरळांचा त्रास

घरातल्या झुरळांमुळे अक्षरक्ष:वैताग येतो. अनेक उपाय केले तरी घरातील झुरळ काही कमी होत नाही.

Cockroach Eggs

झुरळांची अंडी

घरातील झुरळ असण्यामागचे कारण म्हणजे झुरळांची अंडी. घरामध्ये झुरळांची अंडी ओळखणे आणि ती वेळीच नष्ट करणे महत्वाचे आहे.

Cockroach Eggs

झुरळांची अंडी कशी शोधायची?

झुरळ मारणे सोपे आहे, पण त्यांची अंडी शोधून ती नष्ट करणे थोडे कठीण असते. कारण झुरळे आपली अंडी उघड्यावर घालत नाहीत, तर ती एका कडक कवचामध्ये सुरक्षित ठेवतात.

Cockroach Eggs

कशी दिसतात झुरळांची अंडी

झुरळांचे अंडे दिसायला एका छोट्या कॅप्सूलसारखी लांबट असतात.

Cockroach Eggs

रंग

झुरळाची अंडी जशी जुनी होतात तसा त्यांच्या अंडाचा रंग बदलतो. घरात आढळणारी झुरळाची अंडी लाल किंवा काळ्या रंगाची असतात.

Cockroach Eggs

आकार

झुरळाची अंडी कॅप्सूलसारखी दिसतात मात्र ती कव्हरमध्ये असतात ज्याच्याआत १६ ते ४० पेक्षा जास्त झुरळांची छोटी पिल्ले एकत्र वाढत असतात.

Cockroach Eggs

किचनमध्ये कुठे असतात झुरळांची अंडी

किचमध्ये किचन सिंकच्या खालच्या भागात आणि पाईप्सच्या जवळ झुरळांची अंडी असतात.

Cockroach Eggs

जेवणाच्या कपाटांच्या कोपऱ्यात, गॅस शेगडीच्या खाली किंवा रेफ्रिजरेटरच्या मागच्या बाजूला, जिथे गरम हवा असते तेथे झुरळ अंडी घालतात.

जुने रद्दी कागद, पुठ्ठ्याचे बॉक्स आणि फर्निचरच्या फटींमध्ये झुरळांची अंडी असतात.

Cockroach Eggs

next: पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Glass Skin Care Routine
येथे क्लिक करा..