Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांच्या घराजवळ किंवा खिडकीजवळ कबुतरांच्या कुरकुरण्याचा आवाज येत असतो.
पुढे आपण कबुतराच्या कुरकुरण्याच्या आवाजाने वास्तूला काय फायदा मिळतो हे जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मात कबुतरांना प्रेम आणि कामदेवाच्या पत्नीचे वाहन मानले जाते.
अमरनाथ गुहेच्या संदर्भात कबुतरांना शिव-पार्वतीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
तुम्हाला जर श्रावण महिन्यात कबुतराचा आवाज ऐकू येत असेल तर तुमच्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडणार आहेत.
तुम्ही उठल्या उठल्या कबुतरांचा आवाज ऐकला तर ते अत्यंत शुभ मानले जाते.
तुम्ही संध्याकाळी कबुतरांचा आवाज ऐकत असाल तर कामात नुकसान होण्याची शक्यता ज्यास्त असते.
ज्योतिषशास्त्रानुसार कबुतर घरी येणे अत्यंत शुभ मानलं जातं.
कबुतर घरात येण्याने घरात सकारात्मकता येते. मात्र घरावर घरटं बांधणे हे अशुभ मानले जाते.