Surabhi Jayashree Jagdish
डॅशबोर्डवर लाल रंगाचा लाईट पेटल्यास त्याकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं असतं. हा लाईट ब्रेक, इंजिनचं तापमान किंवा ऑईल प्रेशर यांसारख्या महत्त्वाच्या समस्यांबद्दल सूचना देऊ शकतो. असा लाईट गाडी चालवताना सुरूच राहिल्यास सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून त्याचा अर्थ तपासावा.
डॅशबोर्डवर पिवळा किंवा नारंगी लाईट पेटल्यास गाडीमध्ये एखादी संभाव्य समस्या असू शकते. हा लाईट इंजिन, टायर प्रेशर किंवा इतर यंत्रणांशी संबंधित सूचना देऊ शकतो. या लाईटकडे दुर्लक्ष न करता गाडीच्या मॅन्युअलमध्ये त्याचा अर्थ पाहावा आणि गरजेनुसार सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी करून घ्यावी.
हिरवा किंवा निळा लाईट पेटल्यास गाडीतील एखादं फीचर सुरू असतं. हिरवा लाईट इंडिकेटर सुरू असल्याचे सांगतो, तर निळा लाईट अनेक गाड्यांमध्ये हाय बीम सुरू असल्याचे दाखवतो. हे लाईट्स गाडीच्या एखाद्या सुविधेची स्थिती सांगतात आणि त्यांचा अर्थ गाडीच्या मॉडेलनुसार बदलू शकतो.
गाडी चालवताना चेतावणी देणारा लाईट पेटलेला राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही लाईट्स छोट्या समस्येची सूचना देतात तर काही लाईट्समुळे गाडी चालवणं धोकादायक ठरू शकतं. लाईटचा रंग आणि चिन्ह पाहून गाडी थांबवायची की तपासणीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जायचे, हे ठरवावं.
डॅशबोर्डवर इंजिनच्या आकाराचं चिन्ह पेटल्यास त्याला चेक इंजिन लाईट म्हणतात. हा लाईट इंजिन किंवा इंधन आणि उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत काही समस्या असल्याचे दर्शवू शकतो. हा लाईट सतत पेटलेला राहिल्यास गाडीची तपासणी करून घ्यावी आणि लाईट लुकलुकत असल्यास गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॅशबोर्डवर ऑईल, बॅटरी आणि ब्रेक यांच्यासाठी वेगवेगळे लाईट्स असतात. ऑईलचा लाल लाईट इंजिनमधील ऑईल प्रेशर कमी असल्याचं तर बॅटरीचा लाईट चार्जिंग यंत्रणेत समस्या असल्याचं दर्शवू शकतो.
डॅशबोर्डवरील एखादा लाईट वारंवार पेटत असल्यास गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवावी. मेकॅनिक गाडी तपासून समस्येचं कारण शोधू शकतो आणि आवश्यक दुरुस्ती करू शकतो. या लाईट्सकडे वेळेवर लक्ष दिल्यास बिघाड वाढण्याचा धोका कमी करता येतो.