Surabhi Jayashree Jagdish
बिरबलाचा मृत्यू 1586 मध्ये युसूफझाई जमातीशी झालेल्या युद्धात झाला होता.
बिरबलाच्या मृत्यूची बातमी ऐकून सम्राट अकबर खूप दुःखी झाला होता.
यावेळी अकबराने दोन दिवस अन्नपाणी त्यागलं होतं आणि कोणत्याही राजकारभारात लक्ष दिलं नाही.
बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबराने त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली.
दरम्यान अकबराच्या मृत्यूनंतर मुघल दरबारात बिरबलाच्या कुटुंबाबद्दल फारसा उल्लेख आढळत नाही.
काही ऐतिहासिक नोंदीनुसार, बिरबलाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलगी एकट्याच राहिल्या.
याचा अर्थ मुघलांनी त्यांच्या पत्नीला किंवा कुटुंबाला त्रास दिला असं नाही, तर त्यांच्याबद्दलची माहिती नंतरच्या काळात उपलब्ध नाही.