Surabhi Jayashree Jagdish
आजच्या डिजिटल युगात तरुण मुली गुगलचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही तर करिअर, आरोग्य आणि रिलेशनशिप समजून घेण्यासाठीही करतात.
विशेषतः रात्रीच्या वेळेत वैयक्तिक प्रश्न, सौंदर्य, मानसिक आरोग्य आणि नातेसंबंध यावर सर्च वाढलेला दिसतो. या वर्षात रात्रीच्या वेळी तरूण मुलींना काय सर्वाधिक सर्च केलं ते पाहूयात.
पिंपल्स, डाग, ग्लोइंग स्किन आणि घरगुती उपाय यावर मुलींनी मोठ्या प्रमाणात सर्च केलं. रात्रीच्या वेळी DIY स्किन केअर रुटीन सर्च करण्याचा ट्रेंड अधिक दिसला.
केस गळतीवर कंट्रोल, तेल, उपाय असे सर्च खूप वाढले. त्याचप्रमाणे हिवाळा व पावसाळ्यात केसांच्या समस्यांवर उपाय शोधले गेले. यामध्ये घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांना जास्त प्राधान्य दिलं गेलं.
Anxiety, ओव्हरथिंकींग, ताणाचं मॅनेजमेंट, पॅनिक अटॅक यावर मुलींनी जास्त शोध घेतला. रात्री एकटेपणात असे प्रश्न सर्च करण्याचं प्रमाण अधिक असतं.
रिलेशनशिपमध्ये रेड फ्लॅग, खऱ्या प्रेमाचे संकेत, ब्रेकअपमधून कसं सावरावं असे सर्चही करण्यात आले. रिलेशनशिप सल्ल्यांसाठी मुली Google कडे मार्गदर्शनासाठी वळलेल्या दिसल्या
मुलींच्या करियरसाठी बेस्ट ऑप्शन किंवा घरबसल्या कोणती कामं करू शकतो असंही मुलींनी सर्च केलं आहे. स्वतंत्र आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची इच्छा स्पष्ट दिसली.
मुलींनी वजन कसं कमी करावं, बेली फॅट कसं कमी करावं याबाबत देखील मुलींनी सर्च केलं होतं. Slim fit दिसण्यापेक्षा healthy body याकडे हळूहळू कल वाढला.