Eating soap: चुकून तोंडात साबण गेला तर काय होऊ शकतं?

Surabhi Jayashree Jagdish

साबण

अंघोळ करताना अनेकदा आपल्या तोंडात साबण जातो. खासकरून लहान मुलांना अंघोळ घालताना ही समस्या निर्माण होते. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की साबण चुकून तोंडात गेल्यावर काय होऊ शकतं?

Swallowing soap

तोंड आणि घशाला जळजळ

साबणातील रसायनांमुळे तोंड, घसा आणि पोटाच्या आतील भागाला जळजळ होऊ शकते. यामुळे सूज, वेदना आणि त्रास जाणवू शकतो. संवेदनशील ऊतींवर याचा अधिक परिणाम होतो.

Soap side effects

पोटाच्या समस्या वाढतात

साबण पोटात गेल्यानंतर काही मिनिटांतच मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू होऊ शकतात. पोट फुगणे आणि तीव्र पोटदुखीचाही त्रास होतो. कमी प्रमाणात साबण गेल्यावरही ही लक्षणं दिसू शकतात.

Chemical irritation

रासायनिक परिणाम

साबणातील डिटर्जंट आणि सुगंधी रसायनं शरीरासाठी घातक ठरू शकतात. यामुळे शरीरातील नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. काही वेळा गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Mouth irritation

सतत उलट्या

उलट्या सतत झाल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलनही बिघडू शकते. काही प्रकरणांमध्ये रासायनिक न्यूमोनियासारखा धोका वाढतो.

Stomach pain

मानसिक किंवा पोषणाशी संबंधित समस्या

काही लोक मुद्दाम साबण खात असल्यास ते ‘पिका’ या विकाराचं लक्षण असू शकतं.

हा विकार पोषणातील कमतरता किंवा मानसिक आरोग्य समस्यांशी संबंधित असतो.

विकासाशी संबंधित अडचणींमुळेही अशी सवय निर्माण होऊ शकते.

Vomiting after soap

काय कराल?

साबण खाल्ल्यानंतर त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपायांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकतं. वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात.

Diarrhea causes

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा