Dhanshri Shintre
होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे, जो देशभर उत्साह आणि जल्लोषात विविध परंपरांसह साजरा केला जातो.
होळी राधाकृष्णांना समर्पित असलेला सण आहे, ज्यामुळे मथुरा-वृदांवनमधील होळी अत्यंत भव्य आणि विशेष असते.
मथुरा-वृदांवनमध्ये देशभरातील भाविक होळी पाहण्यासाठी येतात आणि भगवान राधाकृष्णांना रंग लावून उत्सव साजरा करतात.
होळीच्या दिवशी भगवंतांना कोणता रंग लावावा, हा प्रश्न नेहमीच भाविकांच्या मनात असतो.
होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना रंग लावला जातो. त्याची पूजा आणि आराधना करणाऱ्यांसाठी विशेष आणि महत्वाचा असतो.
होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना रंग लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि भक्तांसाठी तो एक पवित्र क्षण आहे.
भगवान श्रीकृष्णांना निळा रंग लावला जातो, जो त्यांच्या शक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक मानला जातो.
पिवळा रंगही भगवान श्रीकृष्णांना लावता येतो, कारण हा रंग त्यांच्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो.
भगवान श्रीकृष्णांनी गुलाबी रंग लावण्याचा आदेश दिला, जो प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक मानला जातो, असे सांगितले जाते.
होळीच्या दिवशी भगवंतांना रंग लावण्यापूर्वी त्यांची पूजा आणि आराधना करणे आवश्यक आहे, त्यानंतर रंग लावावा.