Surabhi Jayashree Jagdish
अनेकांना शौचातून रक्तस्राव होण्याची समस्या जाणवते. अशावेळी बरेचजण लाजेखातर डॉक्टरांकडे जात नाहीत.
मात्र असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. याचं कारण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या समस्यांमुळे स्टूलमध्ये रक्त दिसून येऊ शकतं.
शौचातून रक्त येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्याची कारणं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी दिसतात.
पोटात अल्सर झाल्यामुळे तुम्हाला शौचावेळी करताना वेदना जाणवू शकतात. हा त्रास आतड्यांमधील जखमेमुळे होतो. अशावेळी शौचातून रक्तस्राव होऊ शकतो.
एनल फिशर म्हणजे गुदद्वारातील भेग. यामुळे देखील ज्यामुळे शौचात रक्तस्त्राव होऊ शकतो.
अनेकदा आतड्यांसंबंधी समस्येमुळे मलामधून रक्त येऊ शकतं. इंफ्लेमेटरी बाउल डिसिजमध्ये पाचन समस्येमध्ये बिघाड होऊन स्टूलमध्ये रक्त येऊ शकतं.
जर या लक्षणांसोबत तुमच्या शौचाचा रंगही बदलला असेल तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
या ठिकाणी दिलेल्या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहेत.