Saam Tv
अनेक लोक गोड कितीही आवडत असेल तरी डायबिटीजच्या भितीने खाणं टाळतात.
९९ टक्के लोकांना नेहमी वाटत असतं की, डायबिटीज फक्त गोड खाल्यानेच होतं.
पुढे आपण या प्रश्नाच उत्तर जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा यांना डायबिटीज असेल, तर तुम्हालाही होण्याची शक्यता जास्त असते.
बॉडीमधील अतिरिक्त चरबीमुळे इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही, आणि त्यामुळे ब्लड शुगर वाढतो.
नियमित व्यायाम न केल्यास शरीराचं मेटाबॉलिज्म कमी होतं आणि डायबिटीजचा धोका वाढतो.
फक्त गोडच नाही, तर जास्त तेलकट, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, साखर असलेले पॅकेज पदार्थ खाल्याने शरीरात ब्लड शुगर वाढवते.
दीर्घकाळ तणावात राहिल्यास हार्मोन्स बदलतात आणि डायबिटीज होऊ शकतो.
डायबिटीज फक्त गोड खाल्याने होत नाही, पण गोडाचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा धोका वाढतो.