Water Intake: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकतं?

Surabhi Jayashree Jagdish

पाणी

मानवी शरीरामध्ये पाण्याचं महत्त्व खूप मोठं आहे आणि ते आरोग्यासाठी अत्यावश्यक घटक मानलं जातं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. पण आजकाल फिटनेसच्या नावाखाली काही लोक गरजेपेक्षा जास्त पाणी पित आहेत. यामुळे शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होतात.

Hydration | saam tv

मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण

मानवी शरीर सुमारे 60% पाण्याने बनलेलं असतं. हे पाणी शरीरातील विविध क्रियांना योग्य प्रकारे चालवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे पाणी हे शरीराचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.

Hyponatremia | saam tv

दिवसाला आवश्यक पाण्याचं प्रमाण

एका व्यक्तीसाठी दिवसाला साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक मानलं जातं. हे प्रमाण हवामान आणि शरीराच्या गरजेनुसार बदलू शकतं. योग्य प्रमाणात पाणी घेतल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि कार्यक्षम राहातं.

Kidney Health | saam tv

दिवसाला आवश्यक पाण्याचं प्रमाण

एका व्यक्तीसाठी दिवसाला साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक मानलं जातं. हे प्रमाण हवामान आणि शरीराच्या गरजेनुसार बदलू शकतं. योग्य प्रमाणात पाणी घेतल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि कार्यक्षम राहातं.

Sodium Level | saam tv

फिटनेसच्या नावाखाली वाढलेलं पाणी सेवन

आजकाल अनेक लोक फिटनेसच्या नावाखाली गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करतात. त्यांना वाटतं की जास्त पाणी पिणं अधिक फायदेशीर आहे. पण हे शरीरासाठी नेहमीच योग्य असतं असं नाही.

Healthy Lifestyle | saam tv

अतिरेक नेहमीच हानिकारक

गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. त्याचप्रमाणे जास्त पाणी पिण्यामुळेही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संतुलन ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Water Consumption | saam tv

हायपोनेट्रेमिया

जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी होऊ लागतं. या अवस्थेला हायपोनेट्रेमिया असं म्हणतात. यामुळे शरीरात वेदना, सूज, चक्कर येणं आणि वारंवार लघवी होणं अशा समस्या दिसतात.

Excess Water | saam tv

किडनीवर येणारा अतिरिक्त ताण

जास्त पाणी प्यायल्यामुळे किडनीला अधिक काम करावं लागतं. हे विशेषतः किडनीच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तहान आणि हवामानानुसार पाण्याचं योग्य संतुलन राखणं आवश्यक आहे.

Fitness Myths | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

Poor Blood Circulation | saam tv
येथे क्लिक करा