Overhydration: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने काय होऊ शकतं?

Surabhi Jayashree Jagdish

शरीरात पाण्याचं प्रमाण

मानवी शरीरामध्ये सुमारे 60 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. शरीर व्यवस्थित कार्य करण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ऑक्सिजनप्रमाणेच पाण्याचीही शरीराला रोज गरज असते.

water intake | saam tv

3 ते 4 लिटर पाणी

एका व्यक्तीने दिवसभरात साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत चालतात.

hydration tips | saam tv

गरजेपेक्षा जास्त पाणी

सध्या फिटनेसच्या नावाखाली अनेक लोक जास्त पाणी पिण्यावर भर देतात. पण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात.

excess water side effects | saam tv

हायपोनेट्रेमिया

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी होऊ लागतं. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘हायपोनेट्रेमिया’ असं म्हटलं जातं. ही समस्या गंभीर आरोग्य धोक्यांना कारणीभूत ठरू शकते.

healthy water consumption | saam tv

सोडियम कमी झाल्याने होणारे त्रास

शरीरात सोडियम कमी झाल्यास अनेक त्रास जाणवू लागतात. अंगदुखी, सूज येणे, चक्कर येणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. तसेच वारंवार लघवीला जाण्याचाही त्रास होऊ शकतो.

excessive water drinking | saam tv

किडनीवर अतिरिक्त ताण

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर अतिरिक्त ताण येतो. शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते. विशेषतः किडनीच्या रुग्णांसाठी ही सवय धोकादायक ठरू शकते.

health risks of overhydration | saam tv

शरीराची गरज लक्षात घ्या

त्यामुळे पाणी पिताना नेहमी शरीराची गरज लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हवामान, शारीरिक हालचाल आणि तहान यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवावं.

body water percentage | saam tv

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा