Surabhi Jayashree Jagdish
केळ आणि सफरचंद ही दोन्ही फळं पोषणमूल्यांनी भरलेली मानली जातात. अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात किंवा व्यायामानंतर ही फळं एकत्र खातात. या दोन्ही फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
केळ्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. सफरचंदामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असल्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळण्यास मदत होते. ही दोन्ही फळं एकत्र खाल्ल्यास थकवा कमी होतो.
सफरचंदामध्ये असलेलं फायबर पचन सुरळीत ठेवण्यास मदत करतं. केळं पोट शांत ठेवण्यास आणि अॅसिडिटी कमी करण्यास उपयोगी मानलं जातं. त्यामुळे योग्य प्रमाणात ही फळं खाल्ल्यास पचनक्रिया सुधारू शकते.
काही लोकांची पचनसंस्था कमकुत असते. त्यामुळे फळांचं मिश्रण त्यांना लगेच सूट होत नाही. केळ आणि सफरचंद एकत्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस किंवा पोट फुगल्यासारखं वाटू शकतं.
या दोन्ही फळांमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहू शकतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होतं. योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन नियंत्रणासाठी ही फळं उपयोगी ठरू शकतात.
केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. सफरचंदामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे संतुलित आहारात या फळांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.
दोन्ही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी प्रमाणात सेवन करणं आवश्यक असतं. जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच सेवन करणं अधिक सुरक्षित मानलं जातं.