Ankush Dhavre
ओयो म्हटलं की, लोकांच्या मनात एकच गोष्ट येते ती म्हणजे हे कपलसाठी आहे.
मात्र काहींच्या मनात अनेक प्रश्न येतात, की ओयोचा नेमका वापर कशासाठी केला जातो.
केवळ मुंबई नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये ओयो रूम्स उपलब्ध आहेत.
एखादा व्यक्ती ओयो रूम्स बुक करत असेल तर लोकं चुकीचा अर्थ घ्यायला सुरुवात करतात.
मात्र ओयो रूम्स कमी दरात उपलब्ध होतात. याचा कोणी विचारच करत नाही.
ओयो रूम्स कमी दरात चांगले रूम्स उपलब्ध करून देतात, यासह २-४ तासांसाठी रूम बुक करण्याची सुविधाही उपलब्ध असते.
या रूम्सचा वापर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अधिक केला जात असल्याचं ओयोचे सीईओ रितेश अगरवाल यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही वर्षांत ही संख्या झपाट्याने वाढली आहे.