Saam Tv
तुम्हाला बऱ्याच दिवसापासून तोंडात काही वेगळ्या समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कारण ओरल कॅन्सर हा तोडांच्या आणि ऑरोफरीनक्सशी संबंधीत आहे.
हा भाग तुमच्या गळ्याच्या मधला असतो जो तुम्ही पुर्ण तोंड उघडल्यावर दिसू शकतो. पुढे आपण याच तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेणार आहोत.
तुम्हाला तोंडात जखम झाली असेल आणि त्याला खूप दिवस उलटले असतील तर हे तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
ओठ, तोंड किंवा गालाच्या आतल्या भागात गाठ येणे.
हिरड्या, जीभ यांच्या आतल्या भागात जर पांढऱ्या किंवा लाल रंगाचे डाग येणे.
जेवताना किंवा पाणी पिताना घशाला त्रास होणे. तसेच जीभ हलवण्यास त्रास होणे.
जीभ, ओठ किंवा तोडांच्या घशाच्या इतर भागात सुन्नपणा जाववणे, वेदना होणे.
हिरड्या दुखणे किंवा ते दात सैल होणे.