Manasvi Choudhary
बदलती जीवनशैली, ताण-तणावाचं वाढते प्रमाण, व्यायामाचा आभाव, लठ्ठपणा यामुळे हृदयाचे विकार होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे.
हृदयविकार हा शरीराची वाढलेली चरबी किंवा कोलेस्टेरॉल या गंभीर समस्यांमुळे होतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दुखू लागते हे लक्षण दिसताच योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.
हृदयविकाराचा झटका आल्यास अशक्तपणा येतो. डोकं हलकं आणि थंड पडल्यासारखे वाटते.
हृदयविकाराचा झटका आल्यास जबडा, मान आणि पाठीत वेदना जाणवतात. अस्वस्थता वाटते खांदे दुखू लागतात.
हृदय विकार असलेल्या रूग्णांना छातीत मळमळ जाणवते व उलट्या देखील होतात.
हालचाल केल्यानंतर छातीत दुखणे आणि शांत बसले की आराम वाटणे ही हृदयविकाराच्या झटक्याचं प्राथमिक लक्षण आहे.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ही व्यक्तीनुसार वेगवेगळी देखील असतात. काही लोकांना तीव्र वेदना जाणवतात तर काहींना कमी जाणवतात.
काहींना कोणतीही लक्षणे न जाणवता अचानक हृदयविकाराचा झटका येतो अशावेळेस योग्य वेद्यकीय सल्ला घ्या.
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या