Surabhi Jayashree Jagdish
आपण दैनंदिन जीवनात पँट हा इंग्रजी शब्द सहज वापरतो, पण तुम्हाला अनेकांना त्याचा मराठी शब्द काय आहे हे माहिती आहे का. खरं तर मराठीत या कपड्यासाठी एक जुना आणि योग्य शब्द आहे, जो आजही काही ठिकाणी वापरला जातो.
हा शब्द ऐकला की अनेकांना आश्चर्य वाटतं कारण तो फारसा प्रचलित नाही. पण मराठी भाषेतील समृद्ध शब्दसंपदा समजून घेतली तर अशा अनेक रोचक गोष्टी समोर येतात.
पँटला मराठीत विजार असे म्हणतात. हा शब्द कमरेखालच्या पूर्ण पाय झाकणाऱ्या कपड्यासाठी वापरला जातो. पूर्वी मराठी भाषेत हा शब्दच अधिक प्रचलित होता.
जुन्या काळात पुरुषांचे पायघोळ कपडे किंवा ट्राउझर यांना विजार असंच म्हणत असत. ग्रामीण भागात आजही काही वयोवृद्ध लोक हा शब्द वापरतात. हा शब्द आजकाल वापरला जात नाही.
काळानुसार इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक फॅशनमुळे पँट हा शब्द अधिक वापरात आला. शहरी जीवनात हा शब्द इतका रूढ झाला की मराठी शब्द मागे पडला. त्यामुळे अनेकांना मूळ मराठी शब्द माहिती नसतो.
विजार हा शब्द मराठी भाषेच्या जुन्या परंपरेचा भाग आहे. अशा अनेक पारंपरिक शब्दांचा वापर आज कमी झाला आहे. तरीही ते शब्द मराठीच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जातात.
आज शाळा, ऑफिस आणि दररोजच्या बोलण्यात पँट हाच शब्द जास्त वापरला जातो. मराठी बोलताना सुद्धा लोक इंग्रजी शब्द वापरणे पसंत करतात. त्यामुळे विजार हा शब्द फक्त काही ठिकाणीच ऐकायला मिळतो.