Skin Cancer: त्वचेच्या कर्करोगाची सुरुवात ओळखण्यासाठी महत्वाची लक्षणे कोणती?

Dhanshri Shintre

त्वचेचा कर्करोग

त्वचेच्या पेशींमध्ये असामान्य वाढ झाल्यास त्वचेचा कर्करोग होतो. हा एक गंभीर आजार असून कारणे समजून घेणे गरजेचे आहे.

मुख्य कारण

सूर्याचे हानिकारक UV किरण, प्रदूषण आणि रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहेत.

अनेक लक्षणे

त्वचेचा कर्करोग होण्यापूर्वी अनेक लक्षणे दिसतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि योग्य वेळी खबरदारी घ्या.

त्वचेवर गडद गाठ

त्वचेवर गडद गाठ येते, ज्याचा रंग बदलत राहतो, कधी गडद तर कधी हलक्या रंगात दिसू शकतो.

त्वचेवर वारंवार खाज

त्वचेवर वारंवार खाज, वेदना किंवा जळजळ होणे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते, विशेषतः एका ठिकाणी सतत असेल तर.

त्वचेवर लाल मस्से

त्वचेवर लाल मस्से दिसणे कर्करोगाचे गंभीर लक्षण असू शकते; हे वाढू शकतात आणि रंगही बदलू शकतो, दुर्लक्ष करू नका.

जखम

जर त्वचेवरील जखम दीर्घकाळ बरी होत नसेल तर ती त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात, त्वरित लक्ष द्या.

NEXT: जीवनसत्वांच्या कोणत्या अभावामुळे डोळे पिवळसर होतात? जाणून घ्या कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

येथे क्लिक करा