ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळ पाणीमध्ये, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॅास्फरस आणि मॅग्नीज सारखे पोषक तत्व असतात.
दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे फायदे कोणते, जाणून घ्या.
रोज नारळ पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
नारळ पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेटेड राहते.
नारळ पाणीमध्ये फायबर असते. ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते. वेट लॅाससाठी नारळ पाणी फायदेशीर आहे.
दररोज नारळ पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी राहते. आणि चमकदार होते.
नारळ पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. सर्दी, खोकला सारखे आजार असल्यास नारळ पाणी प्यावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.