Manasvi Choudhary
22 जानेवारी काल अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडला.
रामलल्लाच्या मूर्तीची झलक सर्वासमोर आली आहे.
रामलल्लाची बालरूपातील मूर्ती आहे.
रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान झाले आहेत. मूर्तीची उंची ४.२४ असून रूंदी ३ फूट आहे.
रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक, ओम,चक्र, गदा आणि सूर्याची प्रतिके कोरण्यात आली आहे.
रामलल्लाच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.
भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार होते. यामुळे विष्णूचे दहा अवतार रामलल्लाच्या मूर्तीत आहेत.
रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम,राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि विष्णूचे दहा अवतार आहेत.
मूर्तीच्या एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरूड आहेत.