Kidney Health: किडनी फेल होण्यामागची कारणं कोणती? जाणून घ्या! आजच व्हा सावध आणि निरोगी राहा

Dhanshri Shintre

चुकीची सवय

चुकीच्या सवयींमुळे मूत्रपिंड हळूहळू खराब होतात, पण सुरुवातीची सौम्य लक्षणं लक्षात न आल्याने धोका वाढतो.

आजाराला काय म्हणतात

म्हणूनच किडनीच्या आजाराला 'सायलेंट किलर' म्हणतात, कारण ते शरीरात शांतपणे नुकसान करत राहतात, लक्षणांशिवाय.

कमी पाणी पिणे

किडनीच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, कारण पाणी कमी घेतल्यास मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो.

औषधांचे सेवन

सामान्य त्रासासाठी सतत वेदनाशामक औषधे घेणे धोकादायक ठरते, कारण ती किडनीवर गंभीर परिणाम करू शकतात.

धूम्रपान करणे

अनेकांना वाटतं सिगारेट फक्त फुफ्फुसांना नुकसान करते, पण ती किडनीलाही हानी पोहोचवून आजाराचा धोका वाढवते.

जास्त गोड पदार्थ खाणे

अति साखर सेवनामुळे मधुमेह होतो, जो किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे; त्यामुळे गोड खाणं टाळा.

जास्त वेळ बसून राहणे

लांब वेळ एकाच ठिकाणी बसल्याने चयापचय बिघडतो, साखर वाढते आणि त्यामुळे किडनीवर नकारात्मक परिणाम होतो.

NEXT: स्ट्रेसमुळे आरोग्यावर परिणाम होतोय? चिंता कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

येथे क्लिक करा