ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी, जी अनेकदा हळूहळू विकसित होते. वेळेसोबत अधिक तीव्र होते.
ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांना डोकेदुखीचा त्रास असतो. जेव्हा ट्यूमर आजूबाजूच्या निरोगी पेशींवर दबाव आणतो. यामुळे मेंदूला सूज येऊन डोकेदुखी होऊ शकते.
ब्रेन ट्यूमरमुळे झटके येऊ शकतात.
ट्यूमरमुळे मेंदूच्या भाषेसाठी जबाबदार असलेल्या भागाला नुकसान होऊ शकते. ज्यामुळे शब्द बोलण्यात किंवा समजण्यात अडचण येते.
मेंदूतील ट्यूमरमुळे संतुलन आणि समन्वयात समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे चक्कर येणे किंवा चक्कर येऊन पडण्याचा धोका वाढतो.
ट्यूमरमुळे दृष्टी समस्या उद्भवू शकतात. जसे की अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी.
ट्यूमरमुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. लोकांना नेहमीच अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.