ITR filing: 31 जुलैपूर्वी ITR फाईल केल्यास काय फायदे मिळतात?

Surabhi Jayashree Jagdish

आयकर Refund

जर तुमच्याकडून जास्त कर कपात झाला असेल, तर ITR भरल्यानंतर तो परतावा मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. वेळेत रिटर्न भरल्यास रिफंडची प्रक्रिया तुलनेने लवकर पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमचे अडकलेले पैसे लवकर परत मिळण्यास मदत होते.

Income Tax Return | saam tv

दंड टाळता येतो

निर्धारित मुदतीनंतर ITR भरल्यास उशिरा फाईलिंग शुल्क लागू होऊ शकतं. काही प्रकरणांमध्ये व्याजाचाही अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो. 31 जुलैपूर्वी रिटर्न भरल्यास हे अतिरिक्त आर्थिक नुकसान टाळता येतं.

ITR deadline | saam tv

उत्पन्नाचा अधिकृत पुरावा मिळतो

ITR हे तुमच्या वार्षिक उत्पन्नाचं अधिकृत डॉक्युमेंट मानलं जातं. अनेक शासकीय आणि आर्थिक कामांसाठी हा पुरावा उपयोगी पडतो. त्यामुळे वेळेवर ITR भरल्यास तुमच्या आर्थिक नोंदी व्यवस्थित राहतात.

July 31 ITR filing | saam tv

कर्ज मिळवणं सोपं होतं

गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्जासाठी अर्ज करताना बँका आणि वित्तीय संस्था ITR मागतात. नियमित आणि वेळेवर भरलेले ITR आर्थिक विश्वासार्हता दर्शवतात. त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते.

tax refund | saam tv

व्हिसा अर्ज

अनेक देशांच्या व्हिसा प्रक्रियेत अर्जदाराची आर्थिक स्थिती तपासली जाते. अशा वेळी ITR हा महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून स्वीकारला जातो. वेळेवर भरलेलं रिटर्न तुमची आर्थिक पारदर्शकता सिद्ध करण्यास मदत करतात.

taxpayer benefits | saam tv

कर विभागाकडून चौकशी

वेळेवर आणि अचूक ITR दाखल केल्यास कर अनुपालनाबाबत सकारात्मक नोंद राहते. यामुळे कर विभागाकडून अनावश्यक चौकशी किंवा स्पष्टीकरण मागवण्याची शक्यता कमी होऊ शकते.

ITR benefits | saam tv

आर्थिक व्यवहार

मोठ्या मुदत ठेवी (FD), विमा योजना, सरकारी निविदा आणि इतर नियामक प्रक्रियांसाठी ITR आवश्यक असू शकतो. अनेक संस्थांकडून आर्थिक पात्रता तपासण्यासाठी हे डॉक्युमेंट मागितलं जातं.

tax compliance | saam tv

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा