ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आंबा हा जवळपास प्रत्येकाला आवडतो. परंतु आंबा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
आंब्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. जे पचनाची गति वाढवतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
आंब्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यासह चमकदार बनवतात.
आंब्यामधील फायबरमुळे पोट अधिक काळ भरलेले राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
आंब्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात. जे हृदयाच्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि फोलेट आढळतात. जे शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्याचे काम करतात.