Saam Tv
हार्ट अटॅक आला की तो अचानक येतो असेच अनेकांना वाटते. मात्र हार्ट अटॅकला असे काही घटक कारणीभूत असतात जे शरीरात आपल्या नकळत वाढत असतात. त्यामुळेच हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणतात. कारण दिर्घकाळ रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
रक्तातील ldl म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर वाढतात. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
ब्लड शुगर वाढलेली असतानाही काही लोकांना लगेच जाणवत नाही. दीर्घकाळ रक्तातील साखर नियंत्रणात न राहिल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
सिगारेटचा धुर फक्त फुफ्फुसांनाच नुकसान करत नाही, तर स्मोकिंगमुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
एखादी व्यक्ती बाहेरून पूर्णपणे निरोगी आणि फिट दिसत असली तरी BP, कोलेस्ट्रल किंवा ब्लड शुगर वाढलेली असू शकते.त्यामुळे शरीरावर लक्ष देणे गरजेचे आहे असे अपोलोचे डॉ. सुधीर यांनी सांगितले.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.