ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यभरातील प्रत्येक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
काही भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी स्वत:ची काजळी घेण्याची सूचना हवामान खात्याकडून मिळत आहे.
हवामान खात्याकडून पावसाळ्यात विविध अलर्ट नागरिकांना देण्यात येतात. त्यावरुन हवामानाची स्थिती समजण्यास मदत होते.
चला तर जाणून घेऊयात रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ?
जेव्हा नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा अलर्ट देण्यात येतो.
नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे यासाठी प्रशासनाकडून हा अलर्ट देण्यात येतो.
ज्या वेळेस काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यावेळेस नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यासाठी हा अलर्ट देण्यात येतो.
ग्रीन अलर्ट हा जेव्हा संबंधिक ठिकाणी कुठलाही धोका नाही त्यावेळेस हा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात येतो.