ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्लड कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. यामध्ये शरीरात रक्त तयार करणारी बोन मॅरोवर परिणाम होतो. यावेळी असामान्य रक्त पेशी वेगाने वाढतात. आणि निरोगी रक्त पेशी नष्ट होऊ लागतात.
शरीरात ब्लड कॅन्सरची सर्वात गंभीर लक्षणे वेळीच दिसून येतात. यांना दुर्लक्ष करु नका.
ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
ब्लड कॅन्सर असल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे वारंवार ताप येणे, घशामध्ये संसर्ग किंवा फंगल इन्फेक्सन होऊ शकतो.
ब्लड कॅन्सर असल्यास मान, मांडी आणि काखेमध्ये सूज येते. अनेकदा ही सूज वेदनादायी असू शकते.
ब्लड कॅन्सरमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होते. ज्यामुळे त्वचेवर लाल किंवा निळे डाग दिसू लागतात. तसेच लहान जखम झाली असता मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो.
जर शरीरात ही लक्षण दिसू लागताच डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. ब्लड टेस्ट, बोन मॅरो बायोप्सी आणि इमेजिंग टेस्टमुळे ब्लड कॅन्सर ओळखता येते.