Manasvi Choudhary
मुलगी वयात आल्यानंतर शारीरिक बदलामुळे मुलींना मासिक पाळी येते.
मासिक पाळी ही मुलीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दरमहिन्याला मुलींना मासिक पाळी येते.
मात्र तुम्हाला माहितीये का? वाढत्या वयानुसार महिलांची मासिक पाळी येणं बंद होतं.
महिलांची मासिक पाळी थांबण्याचं वय साधारणपणे ४० ते ५० वर्ष असते ज्याा रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात.
रजोनिवृत्तीचा अनुभव प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असतो तो आरोग्यावर अवलंबून आहे.
मासिक पाळी थांबण्याआधी दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीत रक्त प्रवाह कधी कधी कमी होतो किंवा कधी कधी वाढतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.