Manasvi Choudhary
अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही रितेश देशमुखची पत्नी आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया दोघेही २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले.अभिनेत्री जेनेलियाने लग्न केले तेव्हा ती २४ वर्षाची होती
रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही इंडस्ट्रीत आपली अनोखी छाप पाडली आहे.जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं आहे.
रितेश आणि जेनेलियाची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी जेनेलिया १६ वर्षाची होती.
रितेश आणि जेनेलिया तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान एकमेकांना भेटले आणि दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेम झाले.
तुझे मेरी कसम चित्रपटाची शुटिंग संपल्यानंतर या दोघांची भेटणं होत नव्हते दरम्यान फोनवरती हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
१० वर्षे एकमेकांना ओळखल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिंदू आणि ख्रिश्चन अश्या दोन्ही पद्धतीने रितेश आणि जेनेलियाने लग्न केले आहे.
सोशल मीडियावर जेनेलिया आणि रितेश या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतात. नेटकरी देखील फोटोंवर प्रतिक्रिया देतात.