Chhatrapati shivaji maharaj history: प्रतापगडावर मृत्यूपूर्वी अफजलखानाचे शेवटचे शब्द काय होते?

Surabhi Jayashree Jagdish

अफजल खान भेट

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची प्रतापगडावर झालेली भेट इतिहासातील अत्यंत निर्णायक घटना मानली जाते. गळाभेटीच्या वेळी अफजलखानाने कपट करून खंजीराने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी महाराजांनी तत्काळ वाघनखे आणि बिछव्यांनी प्रतिकार केला.

Shivaji Maharaj history

गळाभेटीचा क्षण

प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची गळाभेट झाली तेव्हा वातावरण शांत असल्याचं भासवण्यात आलं होतं. अफजलखानाने अचानक शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला.

Afzal Khan encounter

महाराजांचा प्रतिकार

अफजलखानाचा वार होताच छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला उत्तर दिलं. महाराजांच्या हातात असलेल्या वाघनखांनी त्यांनी अफजलखानावर जोरदार वार केला. हा वार त्याच्यासाठी अनपेक्षित होता.

Maratha empire history

अफजलखानाची प्रतिक्रिया

शिवाजी महाराजांच्या प्रत्युत्तराने अफजलखान गोंधळून गेला. त्याने लगेचच आपल्या सैनिकांना मदतीसाठी हाक मारली. “लढा! लढा! तलवार! तलवार! तलवार घ्या मला!” असं तो ओरडल्याचं वर्णन आढळतं.

Indian history events

अफजल खानाचे शेवटचे शब्द

अफजल खानाला गंभीर जखमा झाल्यानंतर त्याने शेवटचे शब्द उच्चारले. “याने मला मारले! या शत्रूला तात्काळ ठार मारा!” असं तो ओरडत होता.

Maratha warrior story

ऐतिहासिक संदर्भ

अफजलखानाच्या शेवटच्या शब्दांची माहिती ही श्री शिवभारतमधील श्लोकांतून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हे संवाद परंपरेतून प्रचलित झालेले असल्याचं मानलं जातं.

Shivaji strategy

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

turmeric and coriander history
येथे क्लिक करा