Surabhi Jayashree Jagdish
आजपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरू झाली असून पहिल्याचं दिवशी पेपरफुटीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
जालन्यामध्ये दहावी इयत्तेचा मराठीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली.
पेपरफुटीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात कठोर पाऊल उचललं होतं. यामध्ये गेल्या वर्षी पेपरफुटी रोखण्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आला होता.
पेपर फोडल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड होतो.
पेपरफुटीला एखादा अधिकारी जबाबदार असल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटी दंड ठोठावण्यात येतो.
पेपरफुटीमध्ये एक्झामिनेशन सर्व्हिस प्रोव्हायडरचा सहभाग असल्यास त्यालाही 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींचा दंड होतो.
नीटचे परीक्षेचे पेपर सातत्याने फुटत असल्याने फेब्रुवारीत केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मंजूर केला.