Manasvi Choudhary
पूर्वी घरोघरी काहीही बारीक करण्यासाठी खलबत्ता किंवा मुसळचा वापर केला जायचा. मात्र आता आधुनिक युगात मिक्सर, ग्राइंडर, चॉपर याचा वापर केला जात आहे. यामुळे वेळ आणि मेहनत कमी घ्यावी लागते.
आजही आपण भाज्यांचे वाटण सरबत, डोशाचे पीठ बनवण्यासाठी झटपट मिक्सरचा वापर करत आहोत. मात्र मिक्सर वापरताना कोणती काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
मिक्सरमध्ये कोणतेही पदार्थ दळताना चूक करू नये अन्यथा मिक्सर लवकर खराब होते त्याचे ब्लेडची धार कमी होते किंवा तुटते.
गरम मसाला बनवण्यासाठी अनेक महिला मिक्सरच्या भांड्यात कडक खडे मसाला दळतात मात्र असे करू नका पहिले खलबत्यात मसाले बारीक करा नंतर मिक्सरचा वापर करा.
उन्हाळ्याच्या दिवसात घरी लस्सी, सरबत, कोल्ड कॉफी बनवण्यासाठी बर्फाचे मोठे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकतो मात्र असे करू नका ते भांड्यात अडकून राहतात.
भाज्या बनवण्यासाठी वाटण तयार करताना अनेकजण मिक्सरच्या भांड्यात गरम पदार्थ घालून वाटतात मात्र असे करू नका गरम पदार्थ ब्लेंडरमध्ये दाब निर्माण करते यामुळे झाकण फुटू शकते.
फ्रोजन फ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक केल्याने ब्लेंडरची धार कमी होते याशिवाय पानं देखील तुटतात
बिया असलेली फळे पेरू हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटू नका यामुळे बिया भांड्यात अडकू शकता व कडक पदार्थामुळे ब्लेंडर धार कमी होते.