Manasvi Choudhary
स्मार्टफोन वापरताना बॅटरी कमी झाल्यास चार्ज केला जातो. स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? स्मार्टफोन १०० टक्के चार्ज कधीही करू नये.
स्मार्टफोन पूर्ण चार्ज झाल्यावर फोनचे व्होल्टेज वाढतो आणि बॅटरीमधील रासायनिक रचना कमकुवत होते.
सतत फोन चार्जिंग १०० टक्के केल्याने बॅटरीचे नुकसान होऊ शकते.
माहितीनुसार, बॅटरीची चार्जिंग २० ते ८० टक्केच्या मध्ये असणे महत्वाचे आहे. फोनची चार्जिंग ० टक्के होईल असे करू नका तेही फोनसाठी धोकादायक असते.
फोन सतत चार्ज करू नका गरज असेल तेव्हाच फोन चार्ज करा. रात्री झोपण्याच्या वेळी स्मार्टफोन चार्जला लावू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.