Tea Shop: १०० वर्ष जुनं चहाचे दुकान, लोक स्वतः येऊन बनवतात TEA

Dhanshri Shintre

अद्भुत चहाचे दुकान

जगात एक अद्भुत चहाचे दुकान आहे, जे शंभर वर्षांपासून चालू आहे, पण तिथे दुकानदार नसून ग्राहकच चहा करून पैसे देतात.

एकही रुपया चोरीला गेलेला नाही

सर्वात विशेष बाब म्हणजे येथे आजवर एकही रुपया चोरीला गेलेला नाही; हे ठिकाण चहा नाही तर प्रामाणिकपणाचे प्रतीक ठरले आहे.

कुठे आहे

हे अनोखे चहाचे ठिकाण पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात, सेरामपूर या शहरात आहे, जिथे ग्राहक स्वतः चहा तयार करून पैसे देतात.

दुकानाचे नाव काय?

'नरेश शोम टी शॉप' हे नाव असलेले हे दुकान केवळ चहा मिळण्याचे ठिकाण नाही, तर १०० वर्षांची ऐतिहासिक वारसा स्थळ बनले आहे.

चहाचे दुकान सुरु केले

एका अहवालानुसार, सुरुवातीला हे ठिकाण भांडी विक्रीसाठी ओळखले जात होते, पण नंतर नरेश शॉम यांनी येथे चहाचे दुकान सुरू केले.

स्थानिक लोक चालवतात

नरेश शॉम यांच्या निधनानंतर दुकान कोणीही खासगी रीत्या चालवलं नाही; त्याऐवजी स्थानिकांनी मिळून ही परंपरा पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

ग्राहक स्वतःच चहा बनवतात

दररोज सकाळी अशोक चक्रवर्ती दुकान उघडतो, सर्व साहित्य ठेवतो आणि मग स्वतःच्या नोकरीसाठी निघतो, ग्राहक स्वतःच चहा बनवतात.

परिसरातील रहिवासी

निवृत्त नागरिक, दुकानदार आणि परिसरातील रहिवासी येथे एकत्र येतात, चहा तयार करतात, वाटतात आणि दुकानाची स्वच्छता देखील स्वतःहून सांभाळतात.

चहाचे पैसे

या दुकानात कोणीही पैसे घेत नाही, लोक एका लाकडी पेटीत प्रामाणिकपणे चहाचे पैसे ठेवतात.

किती रुपयाला चहा मिळतो?

या दुकानात केवळ ५ रुपयांत २ कप चहा मिळतो आणि गेल्या १०० वर्षांत एकदाही चोरी किंवा फसवणूक झालेली नाही.

NEXT: भारतातील 'या' शहरात एकही ट्राफिक सिग्नल नाही, जाणून घ्या अनोख्या शहराबद्दल

येथे क्लिक करा