Dhanshri Shintre
शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलचे नियोजन आणि अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
मोठ्या की लहान शहरात असो, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही सर्वत्र प्रमुख समस्या आहे.
तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक शहर आहे जिथे वाहतुकीसाठी कोणतेही सिग्नल वापरले जात नाहीत.
कोटा हे भारतातील दुसरे शहर आहे जे सिग्नलमुक्त वाहतूक व्यवस्थेसाठी यशस्वी झाले आहे.
कोटा शहरातील जवळजवळ सर्व चौकांमधील वाहतूक सिग्नल हटवण्यात आले असून सिग्नलमुक्त व्यवस्था राबवली आहे.
कोचिंग सिटी कोटामध्ये विविध भागांतील विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी येतात.
कोटा शहरात वाहतूक कोंडी कमी करणे आणि अपघात टाळण्यासाठी अंडरपाससह विविध आधुनिक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
या शहरात ड्रायव्हर्समधील सुसंवाद आणि आदरामुळे ट्रॅफिक सिग्नलची गरज भासत नाही, असे तज्ज्ञ आणि स्थानिक लोक सांगतात.