Shreya Maskar
काकडीचे सॅलड बनवण्यासाठी काकडी, दही, मोहरी, कांदा, टोमॅटो , आलं पेस्ट, काळी मिरी, जिरे पूड, लाल तिखट, कोथिंबीर, दालचिनी पावडर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
काकडीचे सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या.
आता कांदा , टोमॅटो आणि इतर तुमच्या आवडीच्या भाज्या छान कापून घ्या.
एका भांड्यात दही फेटून घ्या.
फेटलेल्या दह्यामध्ये आल्याची पेस्ट, मोहरी, काकडी आणि कांदा घाला.
सॅलडमध्ये मसाले घालून छान मिक्स करा.
शेवटी सॅलडमध्ये कोथिंबीर घालून काकडीचे सॅलडचा आस्वाद घ्या.
व्यायामानंतर नियमित या सॅलडचे सेवन केल्यास ७-१४ दिवसात तुमच्या वजनात फरक दिसेल.