Shruti Vilas Kadam
वॉटर फास्टिंगमध्ये ठराविक काळासाठी कोणतंही अन्न न खाता फक्त पाणी पिलं जातं. हा उपवास 24 तासांपासून ते काही दिवस केला जातो.
हो, सुरुवातीला वजन कमी होतं. पण हे मुख्यतः पाण्याचं वजन आणि मसल लॉस असतं, फॅट लॉस कमी प्रमाणात होतो.
जास्त काळ उपवास ठेवल्यास मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतो, ज्यामुळे नंतर वजन पटकन वाढण्याची शक्यता असते.
शरीर स्वतःच डिटॉक्स करतं (लिव्हर, किडनीद्वारे). वॉटर फास्टिंगमुळे वेगळा डिटॉक्स होतो, याचे ठोस पुरावे कमी आहेत.
विकनेस, चक्कर येणे, लो ब्लड शुगर, डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट असंतुलन यांसारखे धोके संभवतात.
गर्भवती महिला, मधुमेह रुग्ण, हृदयविकार असलेले किंवा औषधे घेणाऱ्यांसाठी वॉटर फास्टिंग धोकादायक ठरू शकतं.
क्रॅश डायटऐवजी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि इंटरमिटंट फास्टिंगसारखे सुरक्षित पर्याय वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आणि टिकाऊ असतात.