Shruti Vilas Kadam
कच्ची कैरी (1), बेसन (1 कप), लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, मोहरी, कढीपत्ता, मीठ, तेल आणि पाणी. भाकरीसाठी ज्वारीचं पीठ घ्या.
कैरी सोलून किसून घ्या किंवा बारीक तुकडे करा. यामुळे पिठल्यात आंबटपणा छान मिसळतो.
कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि मिरच्या टाका. छान फोडणी सुटू द्या.
आता त्यात किसलेली कैरी घालून 2-3 मिनिटे परता. यामुळे तिचा कच्चा स्वाद कमी होतो.
बेसन पाण्यात गाठी नसतील असे मिसळा आणि ते मिश्रण कढईत घाला. सतत ढवळत राहा.
मीठ, हळद घालून मध्यम आचेवर शिजवा. पिठलं घट्ट होतंय तोपर्यंत ढवळत राहा.
गरमागरम ज्वारीची भाकरी आणि कैरीचं पिठलं एकत्र सर्व्ह करा. वरून तूप घातल्यास चव अधिक वाढते.