Shruti Vilas Kadam
खूप कमी कॅलरीचे आहार घेतल्यास शरीर ‘स्टार्वेशन मोड’मध्ये जाते. यामुळे शरीर चरबीऐवजी मांसपेशी जाळू लागते. तसेच पुन्हा सामान्य आहार सुरू केला की वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते.
वजन कमी करताना प्रोटीन कमी घेतल्यास थकवा जाणवतो, शरीर सैल होते आणि मांसपेशी कमकुवत होतात. प्रोटीन हे मांसपेशी टिकवण्यासाठी आणि मेटाबॉलिझम सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असते.
दररोज पुरेशी झोप न घेतल्यास भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे जंक फूड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, ज्याचा वजन कमी करण्यावर नकारात्मक परिणाम होतो.
धावणे, चालणे किंवा सायकलिंग उपयुक्त असले तरी फक्त कार्डियोवर लक्ष केंद्रित करणे चुकीचे आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे मांसपेशी मजबूत होतात आणि मेटाबॉलिझम वाढतो, यामुळे वजन घटवणे सोपे होते.
वेळेवर आणि संतुलित आहार न घेणे ही मोठी चूक आहे. दीर्घकाळ उपाशी राहणे किंवा सतत खाण्याचा विचार करणे शरीरासाठी घातक ठरते. दिवसभर योग्य वेळेत पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
कमी वेळेत वजन कमी करण्याच्या अपेक्षेमुळे लोक टफ डाएट्स आणि अति व्यायाम करतात. हे आरोग्यास हानिकारक असून वजन पुन्हा वाढण्याचा धोका अधिक असतो.
मानसिक तणाव, खराब झोप आणि हार्मोनल असंतुलन यामुळे वजन वाढते. या घटकांकडे दुर्लक्ष केल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते आणि अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.