Shruti Vilas Kadam
वजन कमी करण्यासाठी अनेकजण नाश्ता किंवा जेवण टाळतात. मात्र, यामुळे नंतर जास्त भूक लागून ओव्हरईटिंग होऊ शकते. त्यामुळे नियमित आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. रोटी आणि भात योग्य प्रमाणात खा आणि संपूर्ण आहार संतुलित ठेवण्यावर भर द्या.
कधीकधी तहान आणि भूक यातील फरक लक्षात येत नाही. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास आणि अनावश्यक खाणे टाळण्यास मदत होऊ शकते.
डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. फायबर आणि प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते.
घाईघाईने जेवण्याऐवजी हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा. जेवणासाठी १५ ते २० मिनिटे दिल्यास कमी अन्नातूनही पोट भरल्याची भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी तासन्तास कार्डिओ करण्याची गरज नाही. दररोज चालणे आणि दिवसभरातील शारीरिक हालचाल वाढवणेही महत्त्वाचे ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठी महागडे डिटॉक्स ड्रिंक किंवा फॅट बर्नर घेण्यापेक्षा पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या. सातत्यपूर्ण आरोग्यदायी सवयी वेट लॉससाठी अधिक महत्त्वाच्या आहेत.