Shruti Vilas Kadam
कढईत थोडे तूप गरम करून त्यात खसखस आणि सुका मेवा हलका भाजून घ्या. त्यात किसलेले खोबरे आणि गूळ घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्या. शेवटी वेलची पूड घाला.
एका भांड्यात मैदा किंवा गव्हाचे पीठ, थोडा रवा, चिमूटभर मीठ आणि तूप घ्या. पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ काही मिनिटे झाकून ठेवा.
मळलेल्या पिठाचे छोटे समान आकाराचे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची पातळ पुरी लाटून घ्या.
पुरीच्या मध्यभागी तयार केलेले सारण भरा. पारीच्या कडा एकत्र आणून मोदकाचा आकार द्या. कडा व्यवस्थित बंद करा, जेणेकरून तळताना सारण बाहेर येणार नाही.
कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर मोदक सावकाश सोडा. मंद ते मध्यम आचेवर मोदक कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले मोदक टिश्यू किंवा किचन पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या. थोडे थंड झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखवा आणि गरमागरम सर्व्ह करा.