Silver Anklets Cleaning Tips: चांदीची पैंजण काळी पडली आहे? 'या' ५ घरगुती उपायांनी परत मिळवा चमक

Shruti Vilas Kadam

बेकिंग सोडा आणि अॅल्युमिनियम फॉइल

गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्यात अॅल्युमिनियम फॉइल ठेवा. पैंजण काही मिनिटे त्यात ठेवल्यानंतर मऊ ब्रशने हलकेच स्वच्छ करा.

How to Clean Silver Anklets

साध्या पांढऱ्या टूथपेस्टचा वापर

पैंजणावर थोडी साधी पांढरी टूथपेस्ट लावून मऊ जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून मऊ कापडाने कोरडी करा.

How to Clean Silver Anklets

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

अर्धा कप पांढऱ्या व्हिनेगरमध्ये बेकिंग सोडा मिसळून तयार केलेल्या द्रावणात पैंजण काही वेळ ठेवू शकता. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन व्यवस्थित कोरडी करा.

How to Clean Silver Anklets

लिंबू आणि मीठ

लिंबाच्या रसातील आम्लीय गुणधर्म आणि मिठाचा सौम्य घर्षणात्मक प्रभाव चांदीवरील काळसर थर साफ करण्यास मदत करू शकतो. लिंबू-मिठाने हलक्या हाताने पैंजण स्वच्छ करा.

How to Clean Silver Anklets

चिंचेचा वापर करा

चिंच पाण्यात भिजवून तिचा घट्ट लगदा तयार करा. त्यात पैंजण काही वेळ ठेवून मऊ ब्रशने हलकेच घासा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

How to Clean Silver Anklets

पैंजण काळी का पडते?

चांदीचा हवेत असलेल्या सल्फरयुक्त घटकांशी संपर्क आल्याने तिच्या पृष्ठभागावर काळसर थर तयार होतो. घाम, ओलावा आणि प्रदूषणामुळे ही प्रक्रिया आणखी वेगाने होऊ शकते.

How to Clean Silver Anklets

साफ केल्यानंतर ही काळजी घ्या

पैंजण स्वच्छ केल्यानंतर ती मऊ कापडाने पूर्णपणे कोरडी करा. पैंजणावर खडे किंवा नाजूक डिझाइन असल्यास ती जास्त वेळ पाण्यात भिजवणे किंवा जोरात घासणे टाळा.

How to Clean Silver Anklets

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Detox Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा