Shruti Vilas Kadam
एका ग्लास किंवा बाटलीत पाणी घ्या. त्यात काकडीचे काही काप, लिंबाचे २-३ काप आणि मूठभर पुदिन्याची पाने टाका. हे पाणी काही तास फ्रिजमध्ये ठेवा.
सकाळी उठल्यानंतर साधं पाणी प्यायल्यानंतर हे डिटॉक्स वॉटर घेऊ शकता. दिवसाची सुरुवात हायड्रेशनने करण्याचा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
या पेयातील मुख्य घटक पाणी असल्याने शरीरातील द्रवपातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर हे पाणी ताजेतवाने वाटू शकते.
लिंबू आणि पुदिन्यामुळे या पाण्याला ताजेतवाना चव मिळते. भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
या डिटॉक्स वॉटरमध्ये अतिरिक्त साखर किंवा कॅलरी नसतात. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी हे पेय घेतल्यास एकूण कॅलरीचे सेवन कमी करण्यास मदत होऊ शकते.
काकडी आणि पुदिन्यामुळे पाण्याला फ्रेश चव मिळते. त्यामुळे साधे पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तींना दिवसभर अधिक पाणी पिण्यास प्रोत्साहन मिळू शकते.
सकाळी, जेवणाच्या मध्ये किंवा व्यायामानंतर हे पाणी घेऊ शकता. मात्र, हे कोणतेही ‘मॅजिक डिटॉक्स’ पाणी नसून संतुलित आहार आणि पुरेशा पाण्याची जागा घेऊ शकत नाही.