Shruti Vilas Kadam
पुरुषांच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त असते. स्नायू अधिक कॅलरी जाळतात, त्यामुळे वजन कमी होण्याचा वेग वाढतो.
पुरुषांचा बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) सामान्यतः जास्त असतो. त्यामुळे विश्रांतीच्या अवस्थेतही त्यांचे शरीर अधिक ऊर्जा खर्च करते.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायू वाढण्यास मदत होते. महिलांमध्ये इस्ट्रोजेनमुळे शरीरात चरबी साठवण्याची प्रवृत्ती तुलनेने अधिक असते.
महिलांच्या शरीरात विशेषतः कंबर, नितंब आणि मांड्यांवर चरबी साठते. ही चरबी कमी होण्यासाठी तुलनेने अधिक वेळ लागू शकतो.
पुरुषांचे शरीर आकाराने मोठे असल्यामुळे दैनंदिन हालचालींमध्येही त्यांच्याकडून अधिक कॅलरी खर्च होतात.
डाएट किंवा व्यायाम सुरू केल्यानंतर पुरुषांमध्ये सुरुवातीला पाण्याचे वजन आणि अतिरिक्त चरबी वेगाने कमी होऊ शकते. त्यामुळे परिणाम लवकर दिसतात.
मासिक पाळी, गर्भधारणा यांसारख्या हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या वजन कमी होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.