Shruti Vilas Kadam
दररोज वजन तपासल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. शरीरातील पाणी, हार्मोन्स किंवा स्नायूंच्या बदलांमुळे वजनात चढ-उतार होत असतात. त्यामुळे फक्त वजनाऐवजी शरीरातील बदल आणि फिटनेसकडे लक्ष द्या.
अनेकजण वजन कमी करण्यासाठी नाश्ता किंवा जेवण टाळतात. पण त्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि नंतर जास्त भूक लागून ओव्हरइटिंग होऊ शकतं. वेळेवर संतुलित आहार घेणं अधिक फायदेशीर ठरतं.
फक्त धावणं किंवा कार्डिओ करून वजन कमी होत नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीर अधिक कॅलरी बर्न करतं. त्यामुळे कार्डिओसोबत वेट ट्रेनिंगही आवश्यक आहे.
प्रोटीनयुक्त आहार शरीराला ऊर्जा देतो आणि पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतो. प्रोटीन कमी घेतल्यास वारंवार भूक लागते आणि स्नायूंची ताकद कमी होऊ शकते.
लो-फॅट किंवा शुगर-फ्री लिहिलेले पदार्थ नेहमीच हेल्दी असतात असं नाही. अशा पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर आणि कॅलरीज असू शकतात. त्यामुळे लेबल वाचूनच पदार्थ निवडा.
झोप कमी झाल्यास भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा वाढते आणि वजन कमी होण्यात अडथळे निर्माण होतात. दररोज ७ ते ८ तास झोप आवश्यक आहे.
काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात वजन कमी करण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. वजन कमी करणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. संयम आणि सातत्य ठेवल्यासच चांगले परिणाम मिळतात.