ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात जवळपास प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्याला पोहा किंवा उपमा बनवला जातो. हा दोन्हीही पदार्थ टेस्टी आणि हेल्दी आहेत.
परंतु वजन कमी करण्यासाठी पोहा की उपमा काय फायदेशीर आहे, जाणून घ्या.
पोहा तांदळापासून बनतो. पोहा बनवताना मोहरी, जीरे, कढीपत्ता, कांदा आणि शेंगदाण्याचा वापर केला जातो. यामुळे पोहा खाल्ल्याने जास्त वेळेपर्यंत भूक लागत नाही.
उपमा रव्यापासून बनतो. यामध्ये मोहरी जीरे आणि भाज्यांचा वापर केला जातो. हे मऊ असते ज्यामुळे पचनासाठी फायदेशीर असते. उपमा खाल्ल्याने अधिक काळापर्यंत पोट भरलेले राहते.
१५० ग्रॅम पोहामध्ये १८० ते २०० कॅलरीज असतात. यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.
एक प्लेट उपमामध्ये २२० ते २५० कॅलरीज असतात. उपमा बनवताना जास्त तेल किंवा तूपाचा वापर केल्याने पोहाच्या तुलनेत यामध्ये जास्त फॅट्स असतात.
कॅलरीजचे प्रमाण पाहता पोहा वजन कमी करण्यासाठी हेल्दी नाश्ता आहे, तर अधिक काळापर्यंत पोट भरलेले राहण्यासाठी उपमा हा बेस्ट पर्याय आहे. तुम्ही दोन्ही पदार्थांमध्ये कमी तेल आणि जास्त भाज्या घालून हेल्दी डिश बनवू शकता.