Shreya Maskar
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी रोज २० मिनिटे दोरीवरच्या उड्या मारा. पोटावरची अतिरिक्त चरबी आणि वाढलेले वजन कमी करण्यास खूप मदत होईल.
दररोज २०-२५ मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने 225 ते 290 कॅलरीज बर्न होतात. वेगाने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सहनशक्ती निर्माण करतो.
दोरीवरच्या उड्या मारण्यापूर्वी हलका व्यायाम करणे आवश्यक आहे, यामुळे शरीर गरम होते आणि सक्रिय होऊ लागते. रिकाम्या पोटी दोरीवरच्या उड्या मारू नका, यामुळे चक्कर आणि पोटदुखी होऊ शकते.
जेवणानंतर लगेच दोरीवरच्या उड्या मारणे आरोग्यास घातक ठरते. त्यामुळे जेवणानंतर २-३ तासांनी दोरीवरच्या उड्या मारा.
दोरी उड्यांमुळे तुमच्या हृदयाची गती झपाट्याने वाढते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि तुमचे हृदय व फुफ्फुसे मजबूत होतात.
दोरी उड्या हाडांची खनिज घनता वाढवण्यास आणि ऑस्टियोपोरोसिसचा (हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात) धोका कमी करण्यास मदत करतात.
या हालचालीमुळे तुमच्या पोटऱ्या आणि पायांना टार्गेट केले जाते. तसेच दोरीला गतिमान ठेवण्यासाठी तुमचे कोर, खांदे आणि हात यांचाही वापर होतो, यामुळे शरीर सक्रिय राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.