Shruti Vilas Kadam
वजन कमी करण्यासाठी जास्त साखर असलेली शीतपेये आणि इतर ड्रिंक्स टाळा. त्याऐवजी लिंबूपाणी, नारळपाणी आणि ग्रीन टी यांसारखे पर्याय निवडा.
व्हाइट ब्रेडऐवजी होल-व्हीट किंवा मल्टीग्रेन ब्रेड आणि ओट्स यांचा आहारात समावेश करा. रिफाइंड कार्ब्समुळे लवकर भूक लागू शकते, त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी ठेवा.
चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये कॅलरी आणि मीठ जास्त असू शकते. त्यामुळे त्याऐवजी भाजलेले मखाणे, चणे आणि नट्स खाण्याचा पर्याय निवडा.
बर्गर आणि इतर फास्ट फूडमध्ये फॅट आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे घरगुती सँडविच, पनीर रॅप किंवा होल-व्हीट रॅप यांसारखे पर्याय निवडा.
वजन कमी करताना जास्त साखर असलेल्या आईस्क्रीमपासूनही अंतर ठेवा. गोड खाण्याची इच्छा झाल्यास ग्रीक योगर्टसोबत फळे, फ्रोजन बनाना स्मूदी किंवा थोडे डार्क चॉकलेट असे पर्याय निवडा.
आहारातून अल्कोहोल पूर्णपणे काढून टाका. त्याऐवजी लिंबू पाणी किंवा साखर नसलेला ताजा ज्यूस घेण्याचा पर्याय निवडा.
सॉसेजसारख्या प्रोसेस्ड मीटमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते. त्याऐवजी अंडी, ग्रिल्ड चिकन, टोफू किंवा पनीर यांसारखे प्रोटीनचे स्रोत आहारात समाविष्ट करा.